
ठाणे, दि. 2 : दरवर्षीप्रमाणे दि. 1 फेब्रुवारी हा लेखा व कोषागारे वर्धापन दिन (कोषागार दिन) म्हणून येथील जिल्हा कोषागार कार्यालयात साजरा करण्यात आला.
कोषागार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोषागारास भेट दिली. जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन कोषागार कामकाजासंबंधी अडचणी जाणून घेतल्या.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत केलेल्या कामाबद्दल त्यांनी कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले
