ठाणे, दि. 3 : राज्य शासनामार्फत सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत वविजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत महाडीबीटीच्या http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे ठाणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे.
सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या नवीन अर्ज भरणाऱ्यासाठी व अर्ज नुतनीकरणासाठी अर्ज स्विकृतीची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2022 आहे. तसेच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व फ्रिशीप योजनांकरिता नवीन नोंदणी व नुतनीकरणासाठी अंतिम मुदत दि. 28 फेब्रुवारी 2022 आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. शिंदे यांनी केले आहे.
