नवी मुंबई, दि.08 :- कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि.14 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10.00 ते दु.1.00 पर्यंत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज/निवेदने स्विकारणार आहेत.
निवेदन स्विकारण्यासाठी निकष
लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गा-हाणे ऐकण्यात येईल. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे व देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भातील केलेले अर्ज आणि तक्रारींचे निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.
सदर दिवशी विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर प्रथम चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्जावर टोकन क्रमांकानुसार आढावा घेण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. असे उपायुक्त,(सामान्य प्रशासन) कोकण विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
