नवी मुंबई, दि.11:-कोंकण भवन येथील ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाकरीता मध्यस्थांची नामिका तयार करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून दि.2 मार्च 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
मध्यस्थ म्हणून काम करण्यास इच्छुक उमेदवारांकरीता आवश्यक शैक्षणिक आर्हता, त्याअनुषंगाने अटी व शर्ती या केंद्र सरकारच्या दि.15 जुलै 2020 च्या केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण नियम तसेच दि.24 जुलै 2020 च्या राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या ग्राहक नियमामध्ये नमुद केल्याप्रमाणे राहतील. उमेदवाराने कृपया या कायद्यातील तरतूदी व त्याअनुषंगिक नियमांचे अवलोकन करावे. याबाबतची विस्तृत जाहिरात, विहित अर्जाचा नमुना, कायद्यातील तरतूदी व इतर नियम, राज्य आयोग व जिल्हा आयोगाचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या https://grahak.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील भरती या टॅबमध्ये उपलब्ध आहे.
या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रबंधक लता कोंडवीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आाहे.
