कल्याण, दि. १८ फेब्रु : लता दीदी म्हणजेच सुरांचा सागर , तेजस्वी तारा…जगात कुणीतरी कोठे तरी लता दिदींची गानी गात असतो किंवा मोबाईल वर ऐकत असतो .दीदी म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा. सर्व सप्तकात फिरणारा गोड सुरेल असा आवाज त्यांना लाभला. त्यामुळेच दशकानु दशके दीदींची गाणी लोकांच्या कानावर पडत आहे. परत परत दीदींची गाणी ऐकून स्वतःचे कान तृप्त करून घेणारे श्रोतेही अगणित आहेत. याचा एक ईष्ट परिणाम म्हणजे अभिजात संगीताचे असंख्य कानसेन तयार झालेत.
याकडे आकृष्ट होणाऱ्या रसिक श्रोत्यांपैकी किमान अर्धे श्रोते लता दीदिनच्या अशा या गीतांच्या मार्गाने आले असणार. आपले लाड़के दैवी व्यक्तिमत्व गान साम्राज्ञी सरस्वती लताजी यांचे नुकतेच निधन झालेले असून देशविदेशातून जनतेने दीदींना गाणी, चित्र, रांगोळी, शिल्प अशा विविध स्वरुपात श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्याचप्रमाणे कल्याणच्या भाग्यश्री रासने हिने कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली तिच्या घराच्या भिंतीवर वीणा, तबला डग्गा, हारमोनियम, सनई, पखवाज या वाद्यांची चित्रे काढून वाद्यरूपी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. भाग्यश्रीला व तिच्या कुटुंबाला गाण्याची खुप आवड असून ती शास्त्रीय गाणे शिकत आहे. त्याच बरोबर चित्रकलेची आवड जोपासत तिने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे
.
