कल्याण, दि. ७ जून ( प्रतिनिधी-भाग्यश्री रासने ) : कल्याण डोंबिवली शहरात रविवारी ५ जून २०२२ रोजी सकाळी ६.३० वाजता महापालिका मुख्यालय प्रांगणात निसर्गोत्सव साजरा करण्यात आला. प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह सामाजिक संस्थाच्या पुढकाराने विविध उपक्रम राबवीले. यावेळी हिरकनी महिला सायकल क्लब सहभागी झाले असून त्याना डॉ. अश्विन ठक्कर यांच्या सौजन्याने १०० हेल्मेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक संस्था व काही दानशूर व्यक्तिनि जमेल तसे हेल्मेट, सह सायकली मिळवून देण्यास मोलाची मदत केली. नागरिकांकडुन जमा झालेल्या जुन्या व नव्या सायकलिंचे महापालिका शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना हेल्मेट सह वाटप करण्यात आले. शहरात दररोज कामावर सायकल वरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांचा “पर्यावरण दूत” म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुरेश पवार, नगर सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीहि रविवारी पहाटे आयुक्त बंगल्यापासुन मनपा मुख्यालयापर्यंत सायकल चालवत प्रवास केला.
“माझी बाग माझा परिसर” या विषयीच्या अनुषंगाने आयोजित फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्या 3 स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रशस्ति पत्रक देऊन सत्कार करण्यात आले. सहभागी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
५ व ६ जून रविवारी व सोमवारी विविध वृक्षवल्लीच्या हिरवाईचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन मनपा आयुक्त पल्लवी भागवत यांच्या हस्ते झाले. यामध्ये काळजी कशी घ्यावी. स्वयंपाक घरातील कच-यापासुन खत निर्मितीक, आयुर्वेदिक रोपांची माहिती, लैंडस्केप ट्रे ,किचन गार्डनिंग आदिविषयक माहिती देण्यात आली. प्रदर्शन महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी सकाळी 10 ते राञी 8 वाजेपर्यंत विनाशुल्क खुले ठेवण्यात आले होते. अल्प दरात फुलझाडांची विक्रीही करण्यात आली .हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले व विविध नर्सरीचा सहभाग होता.
