
ठाणे, दि. २८ फेब्रु पुनित खांडेकर (प्रतिनिधी): ठाणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा “ठाणे गौरव” ह्या पुरस्काराचे मानकरी ठरले कुणबी कुटुंबात जन्म घेणारे श्री. प्रशांत डिंगलकर. ठाणे गौरव हा नागरी सन्मान आज दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मा. महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे सपत्नीक मा. प्रशांत डिंगलकर यांनी स्विकारला…!
शिक्षणासाठी ठाण्यात आलेले कुणबी कुटुंबात जन्मलेले प्रशांत डिंगलकर आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ठाण्यातच वास्तव्यास होते. पुस्तकांची-वाचनाची आवड जपत उत्कृष्ट लिखाण करत “कुणब्याचा गावगाडा ” सारखे कुणब्यांचे अस्थित्व दाखवणारे पुस्तक त्यांनी लिहले आणि एक लेखक म्हणून वाचकांच्या मनात घर करून राहिले.आपली वाचनाची, लिखाणाची आवड जपत त्यांनी सामाजिक भान देखील वेळोवेळी संवेदनशील पणे समाजात सक्रिय राहून सिद्ध केले. आपल्या आयुष्यात प्रामाणिक पणाची आणि कार्याचा सन्मान म्हणजेच हा “ठाणे गौरव” पुरस्कार.
