ठाणे दि. 04 :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याच्या ई-पॉज मशीनवर धान्य वाटपास दि.06 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या अनुषंगाने जे शिधापत्रिकाधारक माहे जानेवारी व माहे फेब्रुवारी 2022 साठीच्या लाभापासून वंचित राहिले असतील त्यांनी अधिकृत शिधावाटप दुकानात दि. 06 मार्च 2022 पर्यंत आपली बायोमेट्रीक ओळख पटवून धान्य घ्यावे. पात्र लाभार्थ्यांनी उपरोक्त महिन्याचे धान्य घेताना आवश्यक ती खात्री करून आपले नावे अनुज्ञेय असलेले धान्य तपासून घ्यावे व त्यासाठी शासकीय दराप्रमाणे देय असलेली रक्कम खात्री करुन अधिकृत शिधावाटप दुकानदारास अदा करावी. माहे मार्च 2022 साठीच्या शिधाजिन्नसाचे वाटप दि. 08 मार्च 2022 नंतर चालू होईल, असे उपनियंत्रक शिधावाटप ठाणे परिमंडळ ‘फ’ यांनी कळविले आहे.
