ठाणे दि. 08 :- ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योग घटकांनी केंद्र शासनाच्या उद्योग आणि व्यापार अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या सुधारित जी2बी पोर्टलवर (https://services.dipp.go.in/ims) आपली पुनश्चः माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयांतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने 25 मार्च2021 पासून आयईएम अर्ज भरण्यासाठी सुधारीत जी 2बी पोर्टल सुरु केले आहे.एका आईएम कंपनी, व्यावसायिक घटकाच्या नावे त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आईएम जारी केला जात आहे. यासाठी अर्जदारांना पोर्टलवर लॉगिन करून त्यांचा आयईएम संदर्भात डेटा अपडेट अथवा पुर्नप्रमाणित करण्यासाठी 15 जुलै 2021 पासून जी 2बी पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात मार्गदर्शनासाठी पोर्टलवर माहिती उपलब्ध करून दिले आहे.
जरी संबंधित आयईएम (औद्योगिक आवेदनपत्रधारक) घटकांमध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आईएम धारकांनीनव्याने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर पुनश्चः अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणारनाही. त्यानंतर अर्जदारांना एक क्यूआर कोड आधारित पोचपावती दिली जाणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व उद्योग घटकांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर आपली माहिती अद्ययावत करावी व नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकश्री. पाटीलयांनी केले आहे.
