मुंबई, दि. 23 : ठाणे शहराचा घनकचरा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर मौजे भंडार्ली येथील खाजगी मालकांची 3.40 हेक्टर जागा भाडे तत्त्वावर घेण्याकरिता शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धती व प्रचलित नियमांचे पालन करण्यासंदर्भात ठाणे आयुक्तांना आदेशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मौजे भंडार्ली येथील प्रकल्पास जिल्हास्तरीय घनकचरा व्यवस्थापन समितीची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच या संदर्भातील अर्ज प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविला असून त्यास मान्यता देण्याचाही निर्णय झाला आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्प उभारणीच्या विरोधाच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी उपस्थित केला होता.
