ठाणे, दि. २३ (जि.प) : शहिद दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज थोर क्रांतिकारक शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागूल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उच्च श्रेणी लघु लेखक संजय कवडे, सहायक प्रशासन अधिकारी दिलीप भराडे, सहायक प्रशासन अधिकारी मनोहर शेजवळ, कनिष्ट प्रशासन अधिकारी अनिल कांबळे, विस्तार अधिकारी वैभव वायकर, कनिष्ट सहाय्यक समीर राऊत, कनिष्ट सहाय्यक उमेश राठोड, कनिष्ट सहाय्यक मयूर डोंगरे, कनिष्ट सहाय्यक आनंद कोंडीलकर, सामान्य प्रशासन विभागासह, महिला व बाल कल्याण, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
