खेड, दि. २२ मे, पुनित खांडेकर (प्रतिनिधी): साहीलच्या एम.बी.बी.एस. होण्याने कुणबी समाजाला एक आदर्श मिळाला.
“विद्येविना मती गेली मती विनानिती गेली
निती विना गती गेली” ……. असे महात्मा फुले म्हणून गेले आणि याच्यातूनच प्रेरणा घ्यावी आणि आपल्या अस्थित्वाची परिसिमाच बदलून टाकावी अशी यशोगाथा खेड तालुक्यातील कुणबी समाजाचे व्यावसायिक दत्ताराम बैकार यांचे सुपुत्र साहिल दत्ताराम बैकर यांनी एम.बी.बी.एस.ची परीक्षा उ्तीर्ण होऊन लिहून दाखवली.
कुणबी समाज हा शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे अनेक पुरावे इतिहासात आणि ह्या आजच्या काळात देखील कोणीही सहज सांगू शकेल.कुणबी समाजाचा मूळ व्यवसाय म्हणजे शेती ,बदलत्या वेळे सोबत नोकरीसाठी हा समाज मुंबई,पुणे सारख्या ठिकाणी स्थलांतरित होताना आपण बघतो.मात्र खेडच्या साहिल दत्ताराम बैकर यांनी शिकणाचा मार्ग धरला आणि एम.बी.बी.एस. होऊन आपल्या कुटुंबा सोबतच समाजाची देखील मान अभिमानाने उंचावली.अथक परिश्रम घेऊन त्यांनी समाजातील विद्यार्थ्या पुढे एक आदर्श ठेवला.

1 thought on ““साहिल बैकर’ झाला एम.बी.बी.एस. आणि कुणबी समाजाची मान उंचावली””