रत्नागिरी, दि. २२ मे, पुनित खांडेकर (प्रतिनिधी): कुणबी समाजोन्नती संघ मुंबई चे संघ प्रतिनिधी श्री.अरविंद कुरतडकर यांचे पुत्र अमेय कुरतडकर हे एम.बी.बी.एस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांच्या गावचे मेर्वी चे पहिले डॉक्टर बनले.
स्वतः च्या कुटुंबा सोबतच आपल्या गावचे व आपल्या समाजाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहले. आपले वडील अरविंद कुरतडकर समाज कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या ह्या समाज जीवनाचा आदर्श समोर ठेऊन आपण शिक्षित होऊन समाजाला एक आदर्श ठेवावा आणि आपल्या हातून देखील समाजाची सेवा घडावी इतका उत्तुंग विचार मनी बाळगून अमेय आज एम.बी.बी.एस ची परीक्षा पास झाले आणि प्रत्येकासमोर आदर्श ठेवला.
