दि. ११ जून : यंदा मान्सूनची सुरुवात उशिरा होत असल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. दि. ९ जून रोजी संध्याकाळी पावसाने वीजेच्या कडकडाट, वार्यांचया जोरदार प्रवेशासह साधारण एक तासभर मध्यम तर काही ठिकाणी सोसाटयाचा वार्यांसह पावसाने एंट्री घेतली. प्रचंड उकाड्यानंतर गुरुवार पाठोपाठ शुक्रवारी मुंबई शहर व उपनगरात सह पावसाने जोरदार हजेरी लावली. सांयकाळी ८ वाजल्यानंतर विजांच्या कडकडासह आणि ढगांच्या गडगडासह पावसाने सुरुवात केली होती. ती पावसाची बॅटीग राञभर मुंबई, उपनगरात दिसून आली. शहरातील दादर, प्रभादेवीसह कुलाबा, वांद्रेसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाने दमदार सततधार ठेवल्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर याचा आज परिणाम दिसून येऊ शकेल. तिन्हीं मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिरा धावू शकतात. हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुंबईशहर व आसपासच्या परिसरात मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील २-३ दिवसात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवातीला कर्नाटकाच्या कारवारमध्ये आणि गोव्यांच्या वेशीवर रेंगाळलेला मान्सून अखेर आज कोकणात दाखल झाला. सिंधुदुर्गात सर्व तालुक्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाबाबत ही हवामान खाते आशावादी असून पुढील २-३ दिवसात मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून व्यापेल. असा अंदाज भारतीय हवामान शास्ञ विभागाने वर्तविला आहे. येत्या काही तासांत मुंबई व रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
