

कल्याण, दि. 29 भाग्यश्री रासने(प्रतिनिधी) : कल्याण येथे शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व कल्याणच्या जेष्ठ नागरिकांसाठी शिवसेना सर्व पद अधिकाऱ्यांमार्फ़त एक मनोरंजनाची संध्याकाळ म्हणून “दिल धक धक करे ” या विनोदी हल्केफुल् मोफत शो ‘आचार्य अत्रे रंगमन्दिर’ येथे लावण्यात आला .यावेळी कल्याणचे नगरप्रमुख विजय साळवी व इतर शिवसेना मान्यवर उपस्थित होते. सर्व महिलांचे गजरे व एक गोड़ पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले. मध्यांतरात चहा व बिस्किट पुडा असा नाश्ता देण्यात आला सर्व जेष्ठ नागरिकांनी या नाटकासाठी प्रचंड गर्दी केली व नाटकास पसंती दर्शवली.त्यामुळे सर्वांच्याच उत्साहात भर पडली. अत्रे नाटयगृहात उद्धव ठाकरे साहेबांचे शुभेच्छा फलक तसेच भगवे झेंडे लावून परिसर सुशोभित करण्यात आला होता. अशा पद्धतीने अतिशय शांततापूर्वक पण आनंदात उत्साहात कल्याणकरांनी साहेबांचा लक्षात राहिल असा सुंदर वाढदिवस साजरा केला. प्रदीप कबरे व टीम कलाकारांनी नाटक संपल्यावर उद्धव साहेबांना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे आभार मानले.
