ठाणे, दि. 9 चित्रलेखा रासने(प्रतिनिधी) : दि.9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,आत्मा आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.गजानन विद्यालय शाळेत रानभाज्या चे भव्य महोत्सव प्रदर्शनाचे आयोजन सकाळी 11 ते 5 दरम्यान करण्यात आले. यांचे उदघाटन माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांचे हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे कोकण कृषी विभागाचे सहसंचालक अंकुश माने हे देखील उपस्थित होते. संपूर्ण नैसर्गिक, पौष्टीक अन्नघटके, औषधी गुणधर्म युक्त आरोग्य वर्धक नागली,वरी,कडधान्य, रानभाज्या, हात साडीचे तांदूळ, फळभाज्या, कंदभाज्या यांचे आरोग्य साठी काय उपयोग होतो, तसेच नवीन पिढीला देखील रानभाज्या ची माहिती व्हावी हा मुख्य उद्देश असतो, कधीकधी योग्य ती माहिती नसल्याने आपण रानभाज्या खाणे टाळतो. ह्या भाज्या औषधी गुण धर्माने परिपूर्ण असल्याने अतिशय उपयुक्त आहेत. ह्या रानभाज्या काही विशिष्ट ऋतूमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने खास सणा दरम्यान खाल्या जातात. आदिवासी बांधवाना उत्पणाचे स्रोत निमार्ण करणे ,हा समाज आर्थिक दृष्टीने सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्या चे स्थान महत्वाचे आहे. या करिता रानभाज्या विक्री आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात करटोळी, रणकंद, आळू, कोळू, चाईची भाजी, घोळ, भारंगी इ आदी रानभाज्या, कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळे, हातसडीचे तांदूळ, नागली ,वरी नैसर्गिक सेंद्रिय असून सर्व प्रकारची जीवनसत्त्वे त्यात आहेत .या प्रदर्शनात ग्राहकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन खऱ्या अर्थाने आदिवासी दिन साजरा केला.
