डोंबिवली, दि. 10 ऑगस्ट : यावर्षी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आजादी का महोत्सव या कार्यक्रमाचे संपूर्ण देशभर आयोजन करण्यात आलेले आहे.
स्वातंत्र्याचा महोत्सवा या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध ठिकाणी सुरू आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने व सालाबादा प्रमाणे दि. ९ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ (पूर्व) व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या संयुक्त विद्यमाने सर्वप्रथम शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी व.पो. निरी. मधुकर भोगे पो. निरी. कांबळे एपीआय जयेंद्र भोयर, सुप्रिया देशमुख, जावेद शहा, आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ .सीमा वखरे, संपादक राजेंद्र वखरे, पत्रकार सोनाली झोडगे व पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी दिनानिमित्त अंबरनाथ तालुक्यातील बोहोनोली गावातील जिल्हा परिषद च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप शिवाजीनगर पोलीस स्टेशन व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या संयुक्त विद्यमाने वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स. पो. निरी. जयेंद्र भोयर हे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. सीमा वखरे उपस्थित होत्या.
व्यासपीठावर एपीआय सुप्रिया देशमुख, जावेद शहा, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही देशमुख, पत्रकार सोनाली झोडगे उपस्थित होते. या कार्यक्रमाल विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले होते. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थही उपस्थित होते. यावेळी राजेंद्र वखरे यांनी आदिवासी वरील जीवनपट उलगडून दाखविला.तर हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव याचे विश्लेषण आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.सीमा वखरे यांनी केले. तर भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची माहिती शब्द रूपातून पत्रकार सोनाली झोडगे यांनी करून दिली. त्याचबरोबर स. पो. निरी.सुप्रिया देशमुख यांनी मुलांना व मुलींना गुड टच व बॅड टच ,शिक्षण व व्यसन याबाबत विद्यार्थ्यांसह उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात एपीआय जयेंद्र भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कुणीही लहान नाही व कुणीही मोठा नाही. जो तो आपापल्या बुद्धीच्या जोरावर मोठा होत असतो. प्रत्येकाने आपण कुठे जन्मलो याचा विचार करण्यापेक्षा आपण उच्च शिक्षण घेऊन प्रशासनात कसे जाऊ व आपल्या कुटुंबाचे व देशाचे हित कसे जोपासू यावर मार्गदर्शन केले .त्यांनी आदिवासी समाजातील पालकांनी मुलांना खूप शिकविण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप व्यासपीठावरील अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गावातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी एपीआय जयेंद्र भोयर, ए.पी.आय सुप्रिया देशमुख, ए.पी.आय. जावेद शहा, पो. हवा. धांडे, पो. ना. भुसारे, पो.शि. दादासाहेब वाघमारे, बोहोनोली गावचे पोलीस पाटील बाळाराम उघडे, ग्रामपंचायत सदस्य बबन उघडे, ज्येष्ठ नागरिक काशिनाथ हंबीर, भरत निरगुडे व ग्रामस्थतसेच आश्रय महिला संस्था, कल्याणच्या अध्यक्षा सौ. सीमा वखरे, पत्रकार व आदर्श चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी सोनाली झोडगे, अंगणवाडी सेविका देविका उघडे, क्राईम बॉर्डर चे संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वखरे व आदि उपस्थित होते.
आजादी का अमृत महोत्सवा निमित्त अंबरनाथ तालुक्यातील विविध चार ठिकाणी व कल्याण तालुक्या -तील ग्रामीण भागातील चार ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे .
क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था गेल्या ९ वर्षांपासून क्राईम बॉर्डर व पोलीस यांच्या माध्यमातून काम करीत आहे.
या कार्यक्रमासाठी बोहोनोली गावचे पोलीस पाटील बाळाराम उघडे व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र वखरे यांनी केले.
