
कल्याण, दि.12 ऑगस्ट, भाग्यश्री रासने (प्रतिनिधी ) : यंदा १५ऑगस्ट 2022 रोजी भारत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष असल्याने केंद्र सरकारद्वारे ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवून प्रारंभ केला. दिल्लीत इंडिया गेटवर होणाऱ्या संचालनाच्या धर्ती वर कल्याणमध्ये पोलिस प्रशासन, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग, सामाजिक संस्था व नागरिकांचा मोठ्या संख्येेेने सहभाग दिसून आला.

वरूण राजानेही दमदार हजेरी लावली. अशा अल्हाददायक वातावरणात पावसाची कोणतीही तमा न बाळगता आपल्या भारत देशाचा अभिमान जपत उत्साहात हातात तिरंगी झेंडे घेत विविधतेत एकता सांगणारे चित्ररथ, म.गांधी, लो.टिळक, झाशीची रानी
लक्ष्मीबाई यासारखे विविध वेशभूषा, कला व संस्कृतिचे दर्शन घडविले. देशभक्ति वर घोषणा देण्यात आल्या. विशेषत: महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लेझिम ढोलताशा पथका सह महाराष्ट्र पोलिस बँड पथकाने वजवलेल्या देशभक्तिपर गीतांनी सर्वांची मने जिंकली.
कल्याण बिर्ला कॉलेजपासुन या रॅलीची सुरवात होऊन खडकपाड़ा सर्कल, दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महानगर पालिका मुख्यालया कडून, सुभाष मैदानात समारोप झाला. पोलिस प्रशासनाने दिलेल्या वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन सर्वानीच केले व रॅली ला मोकळी वाट करून दिली. त्याबद्दल कौतुकहि वाटले. अतिशय शिस्तबद्ध व शांततेने रॅली पार पडली. या रॅलीत बिर्ला कॉलेजचे नरेशचंद्र, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगड़े व सचिव संजय जाधव,अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परिमंडळ डीसीपी सचिन गुंजाळ, रास्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण अध्यक्ष डॉ.पाटील, कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

