
ठाणे, दि.17 : उल्हासनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागावर्गीय मुलांचे वसतिगृहामध्ये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया ही दि. २६ जून २०२२ पासून सुरु झाली आहे. या वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन वसतीगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
या वसतिगृहात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे निकष लागू राहतील.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग, अपंग, अनाथ, दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी ऑफलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले व पॉलिटेक्नक व अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षास प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज भरु शकतील. उत्पन्नाची मर्यादा शासनाने निर्धारित केल्यानुसार असून इयत्ता ८ वी पासून पुढे प्रवेश देण्यात येतील.
ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत – शालेय विद्यार्थी दि. १५ जुलै २०२२ पर्यंत. इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) – दि. ३० जुलै २०२२ पर्यंत.
बी.ए. / बी.कॉम / बी.एस.सी. अश्या १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम.ए. / एम.कॉम / एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत. व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत आहे.
