कल्याण, दि. 19 ऑगस्ट, भाग्यश्री रासने(प्रतिनिधी) : सामाजिक समता व एकजुटिचे प्रतिक म्हणजे गोपालकाळा.हा सण प्रेम वात्सल्य,कर्तव्य,बंधुता याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या भगवान श्रीकृष्णा ची जन्माष्टमी. कोरोनामुळे 2 वर्ष दहीहंडी उत्सव होऊ शकला नाही. कोरोनाचे महा भयंकर संकट टळले त्यातून आपण काही प्रमाणात सावरलो आणि यंदाचे सण सर्व नियम पाळुन जोरदार साजरे करण्याचे सरकारचे आदेश येताच सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण पसरले आहे.यंदाची दहीहंडी जोरदार साजरी झाली.कल्याण पश्चिम येथे भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम भव्य दहीहंडी मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष विकि गणात्रा ,कल्याण जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे ,मा. नगरसेवक, दया गायकवाड़ , प्रदेश, जिल्हा, शहराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक व गोविंदा उपस्थित होते. या वेळी सर्व गोविंदाला उत्साह व मनोधैर्य वाढ विण्यासाठी सर्वानीच पुढाकार घेतला. संगीत ओर्केस्ट्रा च्या तालावर सर्वानीच ताल धरला .भव्य प्रकाश योजना ने परिसर दुमदुमुन गेला. ढोल ताशा पथकाने देखील उपस्थिती लावली होती.तसेच शिवाजी चौक येथे शिवसेना पक्षातर्फे देखील भव्य दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. एकूणच सर्वत्र ठिकठिकाणी अशाच प्रकारचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी सुरक्षेच्या बाबतीत चोख कामगिरी बजावली.
