नवी दिल्ली, 6 सप्टेंबर चित्रलेखा(प्रतिनिधी) : शिक्षक दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशभरातील 14,500 शाळा विकसित केल्या जाणार आहेत. सोमवारी संपूर्ण देशभरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने एका नव्या उपक्रमाची घोषणा करताना आनंद होत आहे. प्रधानमंत्री स्कूल ऑफ रायझिंग इंडिया योजनेंतर्गत संपूर्ण देशभरात 14,500 शाळा विकसित आणि श्रेणीसुधारित केल्या जाणार आहेत. या शाळा देशाच्या आदर्श बनतील असेही ते म्हणाले.
या शाळांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरुम, क्रीडा आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया हा एक आधुनिक परिवर्तन घडवणारा आणि सर्वांगीण मार्ग असणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. याबाबत ट्वीट करत त्यांनी माहिती दिली आहे.
मोदींनी सोमवारी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. यादरम्यान मोदी म्हणाले की, आपल्याला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचे नाही तर त्यांचे जीवनही बदलायचे आहे. भारत आपली शैक्षणिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करत आहे.
मोदी पुढे म्हणाले की तरुण मनाला घडवल्या बद्दल आम्ही शिक्षकांचे आभारी आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आमच्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. मोदिंनी यापूर्वी ट्विट करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यांनी ट्विट करून लिहिले, “शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.विशेषत: तरुणांच्या मनात शिक्षणाचा आनंद पसरवणाऱ्या त्या सर्व मेहनती शिक्षकांना, मी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एस. राधा कृष्णन यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो.
.
