ठाणे, दि.02 : – गणेश विसर्जनाच्या दिवशी दि. 9 सप्टेंबर २०२२ रोजी वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी विठ्ठलवाडीतील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविली आहे.
वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे
प्रवेश बंद श्री राम चौक ओ.टी. सेक्शन चौक मेनबाजार- व्हिनस चौक- नेताजी चौक-भाटीया चौक-३९ सेक्शन-गाऊन बाजार- दुध नाका- मठ मंदिर चौक या विसर्जन मार्गावरील वाहतूक तसेच रहदारी ही गणपती विसर्जन मिरवणूक पुढील चौकात जाई पर्यंत ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (1) श्री राम चौकाकडून ओ.टी सेक्शन कडे जाणारी वाहतूक पेट्रोलपंपाचे बाजून व्हि.टी.सी. रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. (2) ओटी सेक्शन कडून मेन मार्केट कडे जाणारी वाहतुक ही उल्हास स्टेशन कडे मार्गे इच्छित स्थळी जातील. (3) नेताजी चौकाकडुन व्हिनस चौकाकडे जाणारी वाहतुक ही लालचक्की चौक व मानेरेगाव रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. (4) कैलास कॉलनी कडून भाटीया चौक व नेताजी चौकाकडे येणारी वाहतुक ही संभाजी चौक व उल्हासनगर स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील. (5) दुधनाका कडून गाऊन मार्केटकडे येणारी वाहतूक ही ओ.टी सेक्शन उल्हासनगर ५ मार्गे इच्छित स्थळी जातील.
नो-पार्किंग श्री राम चौक-ओ.टी सेक्शन चौक-मेनबाजार-व्हिनस चौक-नेताजी चौक-भाटीया चौक- ३९ सेक्शन-गाऊन बाजार दुध नाका-मठ मंदिर चौक या विसर्जन मार्गावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दि.०९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १४:०० ते रात्री २४:०० वाजेपर्यंत ‘नो पार्किंग’ करण्यात येत आहे.
पार्किंग मुभा श्री राम चौक- ओटी सेक्शन चौक- मेनबाजार- व्हिनस चौक- नेताजी चौक- भाटीया चौक-३९ सेक्शन-गाऊन बाजार- दुध नाका-मठ मंदिर चौक हा मुख्य विसर्जन मार्ग सोडून इतर पर्यायी मार्गावर पार्किंग मुभा देण्यात येत आहे.
सदरची वाहतूक अधिसूचना ही दि.०९ सप्टेंबर २०२२ (अनंत चर्तुदशी) या गणेश विसर्जन दिवशी दुपारी १४.०० वा. पासून गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत अमलात राहिल. सदरची वाहतुक अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, गणेश मुर्ती विसर्जनातील वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे पोलीस उप आयुक्त श्री. कांबळे यांनी कळविले आहे.
