नवी दिल्ली :11 सप्टेंबर(प्रतिनिधी) : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचं गुरुवारी वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशकं एलिझाबेथ (दुसऱ्या) विराजमान होत्या.
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारत सरकारने देखील एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. रविवारी, 11 सप्टेंबरला भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबरला सरकारी व राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तर या दिवशी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही.
दरम्यान, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्या निधनानंतर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. महाराणी एलिजाबेथ (दुसऱ्या) यांनी 70 वर्ष ब्रिटनच्या शाही परिवाराच्या सिंहासनाची धुरा सांभाळली.
