अहमदाबाद, दि.14 सप्टेंबर चित्रलेखा(प्रतिनिधी : अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात सात मजुरांचा मृत्यू झालाय. तर एक मजूर गंभीर जखमी झाला. सर्व मजूर हे तेराव्या मजल्यावर स्लॅबवर उभे होते. त्यानंतर हा स्लॅब कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.
सर्व मजूर हे एकाचवेळी बांधकाम सुरू असलेल्या स्लॅबवर उभे होते. ज्यादा वजन झाल्यानंतर स्लॅब कोसळला. स्लॅबवर कोसळल्यानंतर एकाच वेळी सर्व मजूर खाली कोसळले. मजुरांच्या सुरक्षेसाठी आठव्या मजल्यावर जाळी बसविण्यात आली होती. एकाच वेळी सर्वजण जाळीवर पडल्याने जाळीवरून सर्व जण खाली पडले. त्यात दोन मजूर तळमजल्यावर, तर सहा मजूर हे बेसमेंटमध्ये पडले. सात ही जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. तर सुपरवायजर हा फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संजयभाई बाबूभाई नायक, जगदीशभाई रमेशभाई नायक, अश्विनभाई सोमाभाई नायक, मुकेश भरतभाई नायक, राजमल सुरेशभाई खराडी, पंकजभाई खराडी असे त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर स्थानिक प्रशासनाने मृतांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे सूचना ही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
