मुंबई, 16 सप्टेंबर, चित्रलेखा (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढणार आहे. एक्सप्रेसवेवरील हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
टोलमध्ये मोठी वाढ झाल्यानं आता सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या टोल दरात वाढ करण्यात येणार आहे.
प्रत्येक तीन वर्षांनी ही दरवाढ ठरलेली आहे.या आधी एक एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. 2030 पर्यंत प्रत्येक तीन वर्षाला ही दरवाढ करण्याचं अध्यादेशात ठरलेलं आहे. त्यानुसार एक एप्रिल 2023 पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत.
सध्या पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी चारचाकी वाहनाना 270 रुपये टोल आकारण्यात येत आहे आगामी काळात हाच टोल जवळपास 320 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
