कल्याण, दि.26 :- कल्याण शहरात दि. 26 सप्टेंबर 2022 ते 05 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नवरात्रौत्सव व दसरा हे सण किल्ले दुर्गाडी येथे साजरे होणार आहेत. याकरिता दुर्गामाता चौक व कल्याण शहरातील परिसरात वाहतुक कोंडी होवू नये, वाहतुक सुरळीत व सुनिश्चित रहावी यासाठी दि. 26 सप्टेंबर 2022 ते दि. 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाहतूकीस बदल करण्यात येत असल्याचे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त गणेश गावडे यांनी कळविले आहे.
वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे
प्रवेश बंद लाल चौकी ते दुर्गामाता चौक मार्गे भिवंडी कडे जाणाऱ्या जड, अवजड मल्टिएक्सल वाहनांना लाल चौकी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदर वाहने लाल चौकी येथून उजवीकडे वळण घेवून आधारवाडी चौक – गांधारी ब्रिज मार्गे पडघा बाजूने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद भिवंडी कडून दुर्गामाता चौकातून लाल चौकी कडे जाणाऱ्या जड, अवजड मल्टिएक्सल वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदर वाहने दुर्गामाता चौकातून डाव्या बाजूस वळण घेवून वाडेघर चौक – आधारवाडी चौक मार्गे मुरबाड रोड हायवेने अथवा लाल चौकी मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद पत्रीपूल कडून गोविंदवाडी बाह्यवळण मार्गावरून दुर्गाडी चौक कडे तसेच दुर्गाडी चौक कडून गोविंदवाडी मार्गे पत्रीपुलाकडे येणाऱ्या लहान वाहनांना (कार, रिक्षा) सायंकाळी 16.00 ते रात्री 24.00 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदर वाहने जुना आग्रा रोडने पत्रीपूल – वल्लीपीर – गुरूदेव हॉटेल – शिवाजी चौक-सहजानंद चौक-लाल चौकी मार्गे दुर्गाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
दुर्गाडी चौक येथून लाल चौकी – सहजानंद चौक – शिवाजी चौक – गुरुदेव हॉटेल – वल्लीपीर येथून
पत्रीपूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
नवरात्रौत्सव व दसरा सणाचे कालावधीत म्हणजेच दि.26 सप्टेंबर 2022 ते दि.05 ऑक्टोबर 2022 रोजी दरम्यान सायंकाळी 16.00 ते 24.00 वाजेपर्यंत हा बदल अंमलात राहिल. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा बदल लागु घेणार नाही असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त श्री. गावडे यांनी कळविले आहे.
