
जाणून घ्या, बाप्पाला मोदक का आवडतात?
● गणपतीला मोदक प्रिय असल्याबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. पहिल्या कथेनुसार, एकदा भगवान शिव झोपले होते आणि गणेश जी दरवाजावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तेथे पोहोचला, गणपती जीने परशुरामला थांबवले.
● यावर परशुराम चिडले आणि त्यांनी गणपतीसोबत लढाई सुरू केली. जेव्हा परशुराम पराभूत होऊ लागला, तेव्हा त्याने शिवजींनी दिलेल्या परशुने गणपतीवर हल्ला केला.
● यामुळे गणपतीचा एक दात तुटला. तुटलेल्या दातांमुळे त्याला खूप वेदना जाणवू लागल्या आणि खाण्यापिण्यात त्रास होऊ लागला. मग त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले कारण मोदक खूप मऊ असतात.
● मोदक खाल्ल्याने त्याचे पोट भरले आणि तो खूप आनंदी झाला. तेव्हापासून मोदक गणपतीची आवडती डिश बनली आहे. असे मानले जाते की जो कोणी त्याला मोदक अर्पण करतो, गणपती त्याच्यावर खूप प्रसन्न होतो.

तळलेले मोदक तयार करण्याची कृती
साहित्य :
● २ वाटी कणीक, १ टेबलस्पून रवा, २ टीस्पून तापवलेल्या तुपाचं मोहन, मीठ, साखर, दूध
कृती :
● २ वाटी कणीक, १ टेबलस्पून रवा, २ टीस्पून तापवलेल्या तुपाचं मोहन, मीठ, साखर, दूध यांचे मिश्रण घेऊन कणीक मळून घ्या.
● कणीक पातळ पुरी सारखी लाटून त्यात पंचखाद्य सारण म्हणून घाला. कडांना हाताच्या चिमटीनं दाबून कळ्या पाडा.
● सगळ्या कळ्या एकत्रित करून मोदकाचा आकार द्या. असे सगळे मोदक तयार करून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात मोदक तळा.

कोकोनट रोझ मोदक
साहित्य:
● एक कप डेसिकेटेड कोकोनट, एक कप मिल्क पावडर, एक कप पिठीसाखर, रोझ इसेन्स १/४ चमचा, खाण्याचा गुलाबी रंग २-३ थेंब, आवश्यकतेनुसार दूध, तूप १/२ चमचा आणि छोट्या मोदकाचा साचा.
कृती:
● प्रथम एका भांड्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर व पिठीसाखर एकत्र करून घ्यावं. त्यात रंग व इसेन्स घालावा.
● चमच्याने थोडं-थोडं दूध घालावं व मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करून घ्यावा. आता मोदकाच्या साच्याला थोडं तूप लावावे व मिश्रणाचा छोटा गोळा त्यात घालावा.
● मोदक तयार करून घ्यावा. अशा प्रकारे सगळे मोदक बनवावे व नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवावं.

पुरणाचे मोदक
घटक
● पुरण बनविण्यासाठी साहित्य.
● 200 ग्रॅम चणाडाळ
● 200 ग्रॅम साखर
● 1 टीस्पून वेलची पूड
● 1 टीस्पून जायफळ पूड
साहित्य
● 100 ग्रम रवा
● 100 ग्रॅम मैदा
● किंचीत मिठ
● तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती
● पुरणाचे मोदक बनविण्यासाठी चना डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावे. पुरणाची डाळ शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यावे. आणि रवीने डाळ घोळून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये साखर घालावी. आणि पुरण पाकास यायला ठेवावे. पुरण पाकास आले की, पुरण यंत्रातून काढून घ्यावे. वेलचीपूड, जायफळ पूड घालून पुरण मिक्स करावे
● पारी बनविण्यासाठी रवा आणि मैदा चाळुन एकत्र करून घ्यावा. त्यामध्ये किंचित मीठ घालावे. आणि तेलाचं मोहन घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा. या मिश्रणाची एक पोळी लाटावी. आणि त्याचे छोटे छोटे गोलाकार करून घ्या.
● पुरण थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावे. तयार केलेली एक छोटीशी पुरी घेऊन त्यामध्ये हा गोळा ठेवावा. आणि त्याला छोट्या छोट्या जुन्नट देऊन मोदकाचा आकार द्यावा.
● अशाप्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावे. आणि तेल किंवा तुप तापायला ठेवावे. आणि मंद आचेवर खमंग तळून घ्यावे. तयार आहेत आपले बाप्पा साठी तयार केलेले पुरणाचे तळलेले मोदक.

चॉकलेट मोदकाची सर्वात सोपी रेसिपी
साहित्य
● 250 ग्रॅम डार्क चॉकलेट
● 100 ग्रॅम नारळ पावडर
● 2 चमचे बदाम
● 2 चमचे काजू
● 2 चमचे पिस्ता
● 50 ग्रॅम दूध
● १ चमचा तूप
● मोदक साचा
कृती
● चॉकलेट मोदक बनवण्यासाठी आधी पतेल्यामध्ये डार्क चॉकलेट मध्यम आचेवर ठेवा आणि ते वितळण्यासाठी ठेवा.
● चॉकलेट वितळल्यावर गॅस बंद करा.
● कढईत तूप घाला, नंतर काजू, बदाम, पिस्ता आणि नारळ घालून 1-2 मिनिटे परता.
● नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून घट्ट मिश्रण तयार करा.
● त्यात चॉकलेट पेस्ट घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.
● मिश्रणातून गोळे घ्या आणि मोदकाच्या साच्यात ठेवा आणि दाबा.
● त्याचप्रमाणे उर्वरित मिश्रणातून चॉकलेट मोदक तयार करा.

गुलाबजाम मोदक
घटक
1/2 लिटर दूध किंवा एक पाव खवा
2-3 वाटी गुलाबजाम मिक्स
1 वाटी साखर
आवडीनुसार फुड कलर्स
2-3 टिस्पून वेलची पूड
2 चमचे पिठीसाखर
कृती
● दूध कढईमध्ये घेऊन खवा होईस्तोवर दूध आटवायचं किंवा तयार खवा घ्यायचा त्यात पिठी साखर घालून गोळा करून घ्यायचा.
● गुलाब जामुन मिक्सचे दोन भाग करून दोन रंगाचे वेगवेगळे गुलाबजाम करायचे.
● गुलाबजाम तळून घ्यायचे आणि पाकात टाकून गार करायला ठेवायचे
● मोदकाच्या मॉलमध्ये अधिक हवा घालायचा आणि मध्ये गुलाबजाम टाकून पुन्हा वरून बंद करून घ्यायचं
● तयार झालेले गुलाबजामचा नैवेद्य

केळे सुकामेवा मोदक
🍽️ साहित्य
• कच्चे केळे सालीसह – २
• मध – 3-4 टेबलस्पून + २ टेबलस्पून सारणासाठी (आपल्या गरजेनुसार गोड कमी जास्त करा.)
• वॅनिला इससेन्स – ½ टीस्पून
• किसलेला सोललेला सुक्का नारळ किंवा डेसिकेटेड – 1/4 कप कप + २ टेबलस्पून घोळवण्यासाठी
• भाजलेले बदाम -२ टेबलस्पून
• भाजलेले काजू – २ टेबलस्पून
• बारीक चिरलेली मनुका – २ टीस्पून
• तूप – १/२ टेबलस्पून
• सजावटीसाठी – काजू, मनुका,किसलेले सुखे खोबरे.
👉 कृती
• केळी मध्ये सुरीने छोटे छोटे कट करून घ्या. तूप लावा आणि मायक्रोवेव्ह मध्ये ५-७ मिनिटे किंवा नरम होईपर्यंत शिजवून घ्या. साले काढू नका.
• किसलेला सुका नारळ किंवा डेसिकेटेड नारळ थोडा भाजून घ्या. जास्त लाल करू नका.
• थंड झाल्यावर केळे सालीसह मिक्सर ला वाटून घ्या.
• त्यात भाजेला किसलेला सुका नारळ, मध आणि व्हॅनिला इससेन्स टाकून परत मिक्सर ला लावून घ्या. जास्त बारीक पेस्ट करू नका.
• कढईत तूप गरम करावे. केळी आणि किसलेला सुका नारळाचे मिश्रण घाला. 2-3 मिनीटे शिजवावे ज्योत बंद करा त्याला थंड होऊ द्या.
• सारण – भाजलेले बादाम आणि काजू जाडसर वाटून घ्यावे. पीठ बनवू नये. थोडे रवाळ ठेवावे.
• दुसऱ्या वाडग्यात सुका मेवा जाड मिश्रण, बारीक कापलेली मनुका आणि मध मिसळावा. बाजूला ठेवा.
• मोदक साठी – केळीच्या नारळाच्या मिश्रणा चे १/२ इंच लहान पेअर आकारातील गोळे बनवा.
• ते तूप लावलेल्या मोदक मोल्ड मध्ये घाला. हाताचा अंगठा वापरून व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी प्रेस किंवा दाबून मध्ये पोकळी करून घ्या.
• बनिवलेले सुका मेवा सारण १ १/२ टीस्पून पोकळीत भरून घ्या.
• एक केळे-नारळ मिश्रणाची छोटी डिस्क किंवा गोल चकती करून घ्या.
• मोदकाची खालची बाजू वर हि चकती ठेववून व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी दाबून घ्या.
• राहिलेल्या केळी नारळाच्या मिश्रणा बरोबर प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
• एका प्लेटमध्ये भाजलेला किसलेला सुका नारळ किंवा डेसीकेटेड नारळ पसरवा.
•बनवलेले मोदक सर्व बाजूंनी व्यवस्थित कोट करून घ्या.
•गार्निश करा आणि सर्व्ह करा.

ड्रायफ्रुट मोदक*
🍽️ साहित्य
• बदाम 200 ग्राम
• काजू 15 – 20
• पिस्ता 15-20
• कीसमीस 200 ग्राम
• खजुर 250 ग्राम
• गुळ 2 मोठे वाटी🎊🎊🎊😊😊
• किसलेलं खोबरं 1 वाटी
• डिंक 2 चमचे
• साखर 2 मोठे चमचे
• तूप
👉 कृती
• प्रथम एका कढईत तूप घालून डिंक भाजून घ्या.
• आता सर्व साहित्य व डिंक एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावी.
• वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून हाताने चांगले मिक्स करून घ्यावे.
• तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करून मोदकच्या साच्यात घालून, साचा बंद करावे.
• लगेच साचा डिमोल्ड करुन तयार मोदक काढावे.
