ठाणे, दि. 26 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास अंतर्गत शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मार्फत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2022-23 शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे महामंडळाने आवाहन केले आहे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थीना उच्च शिक्षणा कारिता बँकेमार्फत मंजुर केलेल्या रु.20.00 लक्षपर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडुन वितरीत केला जाईल. व्याजाचा परतावा महामंडळ केवळ बँकेकडुन वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त 12 टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना मिळेल.
या योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालय – शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, मर्या. पत्ता : एमएमआरडीए, पुनर्वसन बिल्डींग नं. ए/1/7 सिध्दार्थ नगर, चिंधी बाजाराजवळ, कोपरी, ठाणे (पू) 4000603, मो.9320202033 /9930671650 इमेल :- idmobccthane@gmail.com तसेच ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
