रत्नागिरी, सिंधुदूर्ग या पाच जिल्हयात स्थानिकांसाठी पाच दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सामान्य नागरिकांना पर्यटनाचे महत्व, पर्यटनाविषयी जनजागृती होण्याकरीता पर्यटन विभागामार्फत पर्यटन महेात्सव घेण्यास शासनाने मंजूर दिलेली आहे. जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या प्रसिध्दी व प्रचलनासाठी तसेच पर्यटकांच्या वाढीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पर्यटनस्थळांची पर्यटकांना ओळख व्हावी.यासाठी पर्यटन विभागामार्फत पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येतात. रायगड जिल्हयात श्रीवर्धन पर्यटन महोत्सव तसेच रत्नागिरी जिल्हयातील काताळ शिल्प पर्यटन महोत्सव या महोत्सवांतून संस्कृती संवर्धन आणि प्रसार ऐतिहासिक निसर्ग वसुंधरा वारसा संवर्धन, स्थानिक लोककला आणि हस्तकला यांचे संवर्धन ही महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण केली जात आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पर्यटन क्षेत्रावर झालेला मोठ्या परिणामामुळे पर्यटनस्थळांची माहिती पर्यटका पर्यंत पोहोचविणे अडचणीचे होत होते. कोरोना काळात बहुसंख्य पर्यटक ऑनलाईन समाजमाध्यमांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करीत होते. अशा कठीण काळात मिळालेल्या संधीचे सोनं करण्यासाठी पर्यटन विभागाने ऑनलाईन झुम मिटींगमार्फत विविध प्रवर्त्यांद्वारे वेबिनारचे आयोजन केले. फेसबुक लाईव्ह, युट्युब लाईव्ह याद्वारे कोकणातील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. “चला नव्याने कोकण दाखवूया” “ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन” अशा विषयांवर कोकण विभागातील विविध जिल्हयांमध्ये वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
जगभरात प्रसिध्द असलेल्या गोव्यातील बीच शॅकची (चौपाटी कुट्या) संकल्पना कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी उपयोगात आणली जात आहे. कोकणात बीच शॅक धोरण राबवून समुद्र किनाऱ्यांचा क्षमतेनुसार विकास करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हयातील गुहागर आणि आरेवारे समुद्र किनारा, सिंधुदूर्ग जिल्हयातील कुडकेश्वर आणि तारकर्ली समुद्र किनारा, रायगड जिल्हयातील वर्सोली आणि दिवेआगार समुद्र किनारा, पालघर जिल्हयातील बोर्डी आणि केळवा समुद्र किनारा येथे हे धोरण राबविण्यात येत आहे.
पर्यटन हा फक्त एक विरंगुळा आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापच नाही तर एक व्यवसाय देखील आहे. जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. करमणूक करते, आणि आपल्या देशाला, राज्याला, जिल्ह्याला आणि गावाला उत्पन्न मिळवून देते. पर्यटनामुळे आपल्या नवीन संस्कृती शिकण्याची, नवीन लोकांना भेटण्याची, वेगवेगळया ठिकाणांना भेट देण्याची, साहसी कार्य करण्याची संधी मिळते. पर्यटनाच विकासातून देशाची, समाजाची प्रगती साधण्यास मदत होते. कोकणात दरवर्षी मोठया संख्येने पर्यटक भेटी देतात. कोकणात राहतात तिथल्या सेवांचा उपभोग घेतात, वस्तू खरेदी करतात, कोकणात प्रवास करतात यासर्व माध्यमांमधून कोकणाचा आर्थिकदृष्टीने विकास साधला जातो. पर्यटन हे सार्वजनिक आणि खसगी उत्पन्नाचे निरंतर स्त्रोत आहे. पर्यटनामुळे रोजगार निर्मिती होते. स्थानिकांना रोजगाराची संधी मिळते. एखाद्या ठिकाणाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येते त्यानंतर त्या ठिकाणांमध्ये लक्षणीय बदल होतात. पर्यटन विकासामुळे इतर देशातील नागरिक आकर्षित होतात. यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यास मदत होते. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
