मुंबई, दि. 23 ऑक्टोबर : सध्या मुंबई गोवा महामार्गाची अनेक भागांत वाताहात झाली असताना कोकणातील चाकरमानी हक्काचा प्रवास म्हणून कोकण रेल्वेने प्रवास करीत असतात. दिवाळीच्या सुटीत अनेक चाकरमानी आपल्या गावात मुलाबाळांसह येत असतात. मात्र कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना गर्दी उफाळली आहे. जनरल डब्यांमधून प्रवास करताना अनेकांना तर गाडीत प्रवेशच मिळू शकत नाही. आज कोकण रेल्वेला अनेक वर्षे पूर्ण झाल्यानंतरही गर्दीच्या काळात असलेली समस्या अद्यापही कायम आहे. कोकण रेल्वेच्या गाडया ठाणे स्थानकात काही मिनिटे थांबतात. दि.२२ ऑक्टोबर रोजी ठाण्यात आलेल्या गाड्या पूर्णपणे भरून आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना दरवाजातून प्रवेश करणे शक्यच होत नव्हते. त्यामुळे डब्यात शिरण्यासाठी महिला पुरुषांनी मुलानी अक्षरश खिडकीचा आधार घेतला. त्यावेळी प्रवाशांच्या नातेवाइकांनी व काही सामाजिक कामात आघाडीवर असलेल्या तरुणांनी या प्रवाशांना अक्षरशः खिडकीतून आत उचलून पाठविले. डब्याची क्षमता शंभर दीडशे असतानादेखील डब्यात अक्षरशः चारशे ते पाचशे प्रवासी दाटी दाटीने कोंबून बसले होते कोकणात जाण्याचा दृढनिश्चया मुळे हे प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करतात. कोकणातून धावणारी ही कोकण रेल्वे नेमकी कोणासाठी आहे. सणाला जाणारे चाकरमानी दरवर्षी या परिस्थितीला तोंड देत आहेत त्याच्यात बदल होणार की नाही हा प्रश्न कायमच आहे. नेहमी प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील कोकणातील आपल्या बांधवासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रश्नाकडे राजकारण म्हणून न बघता सामाजिक काम म्हणून लोकप्रतिनिधींनी पाहिले पाहिजे व तशा पद्धतीने आवाज उठवणे गरजेचे झाले आहे.
Categories
- Arogya
- kalyan
- Mohali
- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अमरावती
- अर्थकारण
- अलिबाग
- अल्पसंख्पाक विभाग
- अहमदनगर
- अहमदाबाद
- आंतरराष्ट्रिय
- आंतरराष्ट्रीय
- आंध्रप्रदेश
- आरोग्य
- इजिप्त
- उच्च व तंञ शिक्षण विभाग
- उत्तर प्रदेश
- उद्योग
- औरंगाबाद
- कल्याण
- कृषी विभाग
- कोकण भवन
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग”
- क्राईम
- क्रीडा
- क्रीडाविश्व
- खेड
- गडचिरोली
- गृह खाते
- गृहनिर्माण खाते
- चिपळूण
- चेन्नई
- छत्रपती संभाजी नगर
- जनजागृती
- जयपूर
- जल वाहतुक
- जल विभाग
- जामनगर
- जालना
- जैसलमेर
- झिम्बाब्वे
- ठाणे
- डोंबिवली
- ताज्या बातम्या
- दापोली
- दावोस
- दुर्ग
- नगरविकास
- नवी दिल्ली
- नवी मुंबई
- नागपूर
- नागालँड
- नाटक
- नाशिक
- पंढरपूर
- परिवहन
- पर्यटण
- पर्यटन
- पर्यावरण
- पालघर
- पिंपरी
- पुणे
- पुनर्वसन
- पोलंड
- प्रशासन
- फिलिपिन्स
- फेसबुक
- बीड
- बुलढाणा
- भारत
- भिवंडी
- भोपाळ
- मंञी मंडळ निर्णय
- मंञीमंडळ बैठक निर्णय
- मदत व पुनर्वसन
- मनोरंजन
- महसुल
- महाराष्ट्र
- महिला बचत गट
- महिला व बाल विकास
- माहिती आणि जनसंपर्क विभाग
- मुंबई
- रत्नागिरी
- रस्ते व महामार्ग विभाग
- राजकारण
- राजस्थान
- राज्य उत्पादन शुल्क विभाग
- रायगड
- राष्ट्रीय
- रोजगार
- रोहा
- लसीकरण
- वन संपदा
- वाहतुक पोलिस
- वाहतुक विभाग
- विज विभाग
- विधीसेवा
- विशेष
- वैद्यकीय
- शहापूर
- शालेय शिक्षण
- शिक्षण
- शिक्षा
- शिधा वाटप विभाग
- शेती
- सण-संस्कृती
- समाजकल्याण
- साऊथ
- सांगली
- सामाजिक
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक बांधकाम
- सांस्कृतिक
- साहित्य
- सिने वल्ड
- सिनेवार्ता
- सोलापूर
- स्मार्ट सिटी प्रोजेक्ट
- हवामान खाते
- हेल्थ
