मुंबई, दि.7 नोव्हेंबर : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या व्यवहाराची सुरुवात तेजीनं झाल्याची पाहायला मिळाली. जागतिक शेअर बाजारात असलेल्या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर आज पाहायला मिळाला. आशियाई बाजारातही तेजी दिसून येत आहे. आज सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांनी वधारत सुरू झाला. तर, निफ्टी निर्देशांकाने सकाळी 18200 अंकांचा टप्पा ओलांडल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 237.77 अंकांच्या तेजीसह 61,188 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 94.60 अंकांनी वधारत 18,211 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 168 अंकांनी वधारत 61,119.35 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 61.80 अंकानी वधारत 18,178.95 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्स निर्देशांकात समाविष्ट असणाऱ्या 30 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टीमधील 50 पैकी 39 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आहे. 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली आहे.
बँक निफ्टीतही तेजी दिसत असून आतापर्यंतचा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर दरातही तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स निर्देशांकात एसबीआय, मारुती, एचयूएल, अॅक्सिस बँक, नेस्ले, विप्रो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, आयटीसी, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. ब्रिटानिया कंपनीच्या शेअर दरातही तेजी दिसून येत आहे.

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0