मुंबई, दि. 7नोव्हेंबर (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमी गाजवलेल्या नट म्हणजे प्रशांत दामले. मराठी नाटक घराघरात पोहचवलेला, मराठी रंगभूमी जगलेला प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले. गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ म्हणून प्रशांत दामले ओळखले जातात. नाटक कोणतंही असो, ते प्रशांतच्या नावावर चालणारच, ही खात्री निर्मात्याला असतेच असते. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले. रविवारी 6 नोव्हेंबरला मुंबईत षण्मुखानंद सभागृहातील प्रयोगात त्यांनी 12 हजार 500 व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठला आहे. हे नाटक आहे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’. एका कलाकाराने इतके प्रयोग करण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं. रंगभूमीवरील त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. नाटकाच्या 12 हजार 500 व्या प्रयोगासाठी त्यांचं सर्वत्र कौतुक होत असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा या नायकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
रविवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामलेंच्या नाटकाचा 12 हजार 500 वा प्रयोग पार पडला. हा प्रयोग यशस्वी होताच आता महानायक अमिताभ बच्चन यांनी खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, ”प्रशांत दामलेंचा 12,500 वा प्रयोग आज होतो आहे. फक्त 39 वर्षांत एवढे प्रयोग करणं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे! मी प्रशांतजींच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो आणि तेव्हापासून मी प्रशांतजींच्या कामाचा चाहता आहे. आजही प्रेक्षकांना मराठी नाटकांवर प्रेम करायला लावण्यात प्रशांतजींचं मोठं योगदान आहे. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच आहे. माझ्याकडून प्रशांतजींना आणि इतर कलाकारांना शुभेच्छा!” अशा पद्धतीनं महानायकानं प्रशांत दामलेंना शुभेच्छा दिल्यात.
त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर थेट मराठीतून पोस्ट लिहित प्रशांत दामले यांच्या या कारकिर्दीला सलाम केला आहे. आपल्या या पोस्टमध्ये सचिन लिहितो, ‘मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा १२५०० वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’
1983 मध्ये ‘टूरटूर’ या नाटकामधून प्रशांत दामले यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. अभिनयाची आवड त्यांना सुरुवातीपासूनच होती. अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते ‘बेस्ट’मध्ये नोकरीत रुजू झाले. दरम्याच्या काळात ते नाटकांमध्ये देखील सक्रिय होते. त्यांची ‘मोरूची मावशी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ही नाटकं प्रचंड गाजली आहेत.

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0