मुंबई, दि. 7 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : अहमदनगर आज शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कला कौशल्य, विद्यार्थ्यांना शिकविणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आजकाल कालबाह्य शिक्षण सोडून विकसित व अद्यावत शिक्षणाकडे आपला कल हवा. शाळेतील शिक्षण असतानाही विद्यार्थी आज कोचिंग क्लासेस मध्ये जातायत हे शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे. याच आपण आत्मपरीक्षण करायला हवे अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढले. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना यावरून चांगलेच झापले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने नगर मधील सहकार सभागृहात झाले. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, मजी आ.शिवाजीराव कर्डिले, शिक्षक आ. जयंत आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष जे.के पाटील,सचिव शांताराम पोखरकर, स्वागताध्यक्ष सुनील पंडीत, शिवाजीराव काकडे, प्रा.भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, संघाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, शिक्षनाधिकारी अशोक कडूस, वसंत लोढा, ज्ञानेश्वर म्हात्रे, आर.डी.निकम, मधुकर नाईक आदींसह पदाधिकारी व राज्यातून आलेले मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिक्षण व्यवस्था तसेच खासगी कोचिंग क्लासेसचा वाढत प्रभाव यावर भाष्य केले. गेली दोन वर्षे कोरोनाचा काळ होता, यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवासात कसे आणता येईल त्याची आपण चर्चा केली पाहिजे. ऑनलाइन शिक्षण पद्धती स्वीकारल्या पाहिजे.
आता या नवीन डिजिटल युगामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेल्याशिवाय पर्याय नाही. हे आता गोष्ट मान्य झालेली आहे ती मात्र जगाने स्वीकारण्यापूर्वी आपल्या देशाने ती स्वीकारले याचे कौतुक केलं पाहिजे. डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील परंतु त्याचे ज्ञान आपण आत्मसात करणं, त्या तंत्रज्ञानावर आधारित आपण आपल्या शिक्षणाच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे हे आवश्यक आहे.
24 तास खुल्या राहणाऱ्या अभ्यासिका सुरु करणार
माझ्या मतदार संघात 24 तास खुल्या राहणाऱ्या अभ्यासिका सुरु करणार आहे. विशेष म्हणजे या सर्व अभ्यासिका विनामूल्य असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची देखील सोयीसुविधा देखील उपललब्ध करून देणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था सुधारण्यात भर पडेल.
नवीन बदलत्या व्यवस्थेत चांगल्या सूचना करण्याच्या गरजेच्या आहेत. आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला तरच विद्यार्थी आणि शिक्षकांमधील अंतर कमी होईल.असा सल्लाही यावेळी विखेंनी उपस्थित शिक्षकांना दिला आहे.

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0