मुंबई : 9 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी होणार असून आज न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे.
दरम्यान, तपास यंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर संजय राऊत यांच्यावर या संपूर्ण घोटाळ्याचा आरोप ईडीनं केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय काय निकाल देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत.

Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0