हिंगोली, दि. 14 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज 68 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. विशेष बाब म्हणजे आज राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सांगलीवरुन तब्बल 10 हजार नागरिक भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत.
रविवारी ही भारत जोडो यात्रा हिंगोलीच्या कळमनुरी शहरात विश्रांतीसाठी थांबली होती. त्यानंतर आज सकाळी यात्रेचा पुढचा प्रवास सुरु झाला आहे. सकाळी पुन्हा कडाक्याच्या थंडीमध्ये भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. या भारत जोडोमध्ये राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सांगली वरुन हजारो नागरिक दाखल झाले आहेत. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते हिंगोलीत दाखल झाले आहेत.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातही लोकांमध्ये त्याचे आकर्षण असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. नांदेडमधून राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन यात्रेला सुरुवात केली होती. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भारत जोडो यात्रेचा प्रवास यात्रा तामिळनाडूतील
कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली.
पदयात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात पोहोचली यात्रा राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार त्या
या दरम्यान 382 किमी अंतरचा प्रवास होणार
यात्रा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार.
