इंडोनेशिया, दि. 21 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. जकार्ता इथं भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
इंडोनेशियातील प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र सियांजूर, पश्चिम जावा येथे 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होतं. तसेच, यामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं.
भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी भयभीत झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी भूकंप झाला. भारतातही गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्का जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी येथे बुधवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.
दरम्यान, त्याची तीव्रता 4.1 मोजली गेली होती. अरुणाचल प्रदेशात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 9.55 च्या सुमारास हे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 इतकी होती.
