रत्नागिरी जिल्हा – ९ तालुके
शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२२
ते ४ डिसेंबर २०२२
शाखा तालुका दापोलीमध्ये उत्स्पूर्द प्रतिसाद..!!!
कुणबी जोडो आभियानाचे पहिले मानकरी शाखा तालुका दापोलीला जाण्याचे कारणही असे आहे, आपले आभियान २६ नोव्हेंबरच्या “सविधान दिनाचे ” औचित्य साधून दापोली येथून सुरूवात करण्यात आले.
सकाळी ९-३० वाजतां दापोली तालुक्यातील समाज बंधू-भगिनींच्या साक्षीने प्रथम शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तद्नंतर महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यावेळी दापोली तालुका बौद्ध शाखेच्यावतीने ‘भारतीय संविधानाच्या “प्रती संघाध्यक्ष श्री
भूषण बरे आणि सरचिटणीस श्री अरविंद डाफळे यांना प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी दापोलीतीत मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यानंतर अभियान म्हाळुंगे गटाकडे आगेकूच करताना संघाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गात औक्षण करण्यात आले.
दुपारच्या सत्रात लोकमान्य टिळकांच्या चिखलगावी सभा होऊन सायंकाळी ५.३० वा. दापोली तालुक्यातील अभियानाची सांगता झाली. याही ठिकाणी महिला आणि पुरुष वर्गाची प्रचंड उपस्थिती होती.
संघ कार्यकारीणी सदस्यांची राहण्याची आणि भोजनाची चोख व्यवस्था दापोली तालुक्याने केलेली होती.
