मुंबई, दि. 3 डिसेंबर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने वर्ष 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. याप्रमाणे 2023 मध्ये एकूण 25 सुट्ट्या आहेत. एकूण 25 सुट्ट्यांपैकी 1 एप्रिल 2023 ची एक सुट्टी ही केवळ केवळ बँकांसाठी असणार आहे. ती सुट्टी बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी देण्यात आली आहे.
दरम्यान नोकरदार व्यक्ती म्हटलं की कामासोबतच व्यक्तीगत आयुष्यासाठी सुट्ट्याही महत्त्वाच्या असतात. या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये नोकरदारांना घरच्यांसोबत वेळ घालवता येतो आणि कामातून काहीसा ब्रेक घेऊन विसावाही घेता येतो. त्यामुळे नोकरदार वर्ग नवीन वर्षासोबतच त्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांचीही तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत असतो.
याप्रमाणे 2023 मध्ये एकूण 25 सुट्ट्या आहेत. एकूण 25 सुट्ट्यांपैकी 4 सार्वजनिक सुट्ट्या शनिवारी आणि 4 सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा साप्ताहिक सुट्ट्या असणाऱ्यांना या सार्वजनिक सुट्ट्यांचा आनंद आपल्या आठवडी सुट्ट्यांच्या रुपातच घ्यावा लागणार आहे.
शासनामार्फत दर वर्षी शासकीय कार्यालयासाठी सुट्ट्या जाहीर करण्यात येतात. पुढील वर्षासाठी म्हणजे सन 2023 साठी शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. त्याबाबतचा शासन आदेश नुकतेच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण सुट्या, बँकासाठी सुट्या व शनिवार व रविवार या दिवशी येणाऱ्या सुट्या देण्यात आलेल्या आहे.
