एअरेटलची 5 जी प्लस सेवा ही सध्या बारा शहरांमध्ये सुरू आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, गुवाहाटी, पानीपत, पुणे, नागपूर, वाराणसी या शहरांत ही सेवा सुरू आहे. जीओची 5 जी नेटवर्कही सेवा मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, वाराणसी, कोलकाता, पुणे, गुडगाव, नोयडा, गाझियाबाद, बेंगळुरु आणि फरिदाबाद या शहरात ही सेवा सुरू झाली आहे.
ही सेवा कशी मिळवाल?
एअरटेलची 5 जी नेटवर्क सेवा मिळविण्यासाठी तुमचा मोबाइल निर्मात्याने सांगितल्या प्रमाणे अपडेट करावे लागेल. तर त्यानंतर 5 जी सेवा सुरू होईल. जिओची 5 जी सेवा ही सध्या टेस्टिंग प्रक्रियात आहे. कंपनीकडून सेवेबाबत निमंत्रण दिल्यास स्वॉफ्टवेअर अपडेट करायचे आहे. जीओची सेवा ही 239 रुपयांपेक्षा जास्त प्लॅनमध्ये उपलब्ध राहील.
5 जी सेवेसाठी पैसे भरावे लागतील?
5 जी सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत. तुम्ही 4 जी नेटवर्कसाठी जे रिचार्ज करता, त्यामध्येच 5 जी सेवा मिळणार आहे. प्रीपेड, पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी हाच नियम आहे.
काही मिनिटांत डेटा संपेल?
5 जीमध्ये काही मिनिटांत डेटा संपेल, असे वापरकर्ते म्हणत आहे. त्याचे कारण आहे, डेटाचा वेग जास्त आहे. डेटा वेगात ट्रान्सफर होतो. त्यामुळे आपल्याला काही मिनिटांत डेटा संपतो, असे वाटेल.
डाटा लवकर संपेल का?
4 जी पेक्षा ५ जी वेगवान आहे. त्यामुळे डेटा लवकर संपेल का? याचे उत्तर हो आणि नाही दोन्हीमध्ये आहे. ५ जीमुळे डाउनलोडही वेगात होईल. त्यामुळे तुम्ही वेगाने गाणे, चित्रपट व इतर बाबी डाउनलोड करू शकतात. त्यामुळे डेटाही वेगात संपेल. त्यामुळे किती डेटा वापरायचे हे युझर्सवरती अंवलबून आहे.
५ जी मध्ये डेटा कसा वाचवाल?
आपण आपल्या मोबाइलमध्ये डेटा सेव्हर आणि अॅपचा वापर करू शकतो. त्यात तुम्ही लिमिटेड डेटा वापरू शकतात. ते तुम्ही डेटा वापरण्याबाबत अलर्ट देतील.
स्पीड टेस्टमध्ये डेटा संपतो?
टेस्ट स्पीडसाठी अॅप जास्त डेटा वापरता. त्यामुळे जास्त डेटा वापरला जातो. त्यामुळे सातत्याने 5 जीची स्पीड टेस्ट करू नका. हे केल्यास डेटा लवकर संपेल.
सर्वांना 5 जी सेवा कधी उपलब्ध होईल?
5 जी सेवा ही येत्या वर्षात सर्वांना उपलब्ध होऊ शकते. जीओची कंपनीची सेवा देशात 2023 अखेरपर्यंत मिळेल. तर एअरटेलची सेवा मार्च 2023 मध्ये उपलब्ध होईल.
5 जी सेवाचे विस्तारीकरण झाल्यास सेवा महाग होईल ?
देशभरात या सेवेचे विस्तारीकरण झाल्यानंतर ५ जी रिचार्ज प्लॅन ४ जी प्लॅनपेक्षा महाग होतील.
