13डिसेंबर (प्रतिनिधी)
पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
आज सकाळी 9-30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ होणार आहे. हा मोर्चा सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून टिळक चौकातून लक्ष्मी रोडने उलट मार्गे बेलबाह चौका-डावीकडे वळून शिवाजीरोडने उलट मार्गे जिजामात चौक, लाल महल इथे समाप्त होणार आहे.
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. गृहरक्षक दलाचे जवान, शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्च्याच्या वेळी असणार आहे.
पुणे बंद… शहरातील वाहतूक मार्गही बदलले
लक्ष्मी रोड – सोन्या मारूती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चा सुरू झाल्यापासून बेलबाग चौक पास होईपर्यंत)
शिवाजी रोड – स.गो. बर्वे चौक ( मोर्चा सेवासदन चौक पास झाल्यानंतर मोर्चा संपेपर्यंत)
बाजीराव रोड – पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)
गणेश रोड – फकडे हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवासदन चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार)
केळकर रोड – आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (मोर्चा बुधावर चौकातून पास होईपर्यंत)
पर्यायी मार्ग –
मोर्चाच्या कालावधीत वरील मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येत असल्याने वाहन चालकांनी टिळक रोड, केळकर रोड आणि कुमठेकर रोडचा वापर करून इच्छितस्थळी जावं, असं सांगण्यात आलं आहे.
