रायगड:-8 फेब्रुवारी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत-म्हाप्रळ खाडी पूल नेहमीच रहदारी साठी चाकरमानी व प्रवासी वाहतूक करत असतात. परंतु सध्या पर्यावरण खात्याचे नियम धाब्यावर बसवून अयोग्य वेळेत रेतीचे उत्कखनन, मालाची चोरी सुरु आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे. दापोली, मंडणगड येथे राहणारे ग्रामस्थ, मुबंई ला कामधंदा साठी जाणारे चाकरमानी जीव मुठीत घेऊन रोजच्या रोज प्रवास करताना दिसतात. खाडी पुलाला धोका निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम महाड विभागाने सदर पुलाच्या ठिकाणी दोन्ही बाजूला अति धोकादायक पूल असे फलक लावले आहे, तरीदेखील हा पूल दुरुस्ती साठी का लक्षात घेतला जात नाही ? यांचीच खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने भारत सरकारला या सर्व पुलांचे आयुष्य संपलेले असून ते कालबाह्य वाहतूक करण्यास योग्य नाहीत, परंतु तरीही माणसाच्या जीवाची आणि मालमत्तेची काडीचीही पर्वा नसलेल्या व त्यांचे जीव किड्या-मुंग्याप्रमाणे मातीमोल त्या सर्व जीर्ण पुलावरील प्रवासी व अन्य वाहतूक चालूच ठेवून फक्त सूचना फलक लावण्यात येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पुलाचे योग्य ते नियोजन करून नव्याने बांधकामासाठी निधी उपलब्ध करून, तातडीने बांधकाम सुरू करावे. या साऱ्या मागण्या घेऊन सरकार दरबारी संतोष अबगुल प्रतिष्टान पत्र व्यवहार केला. त्यासाठी संतोष अबगूल प्रतिष्ठानचे आवाहन करीत रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी मंडणगड ते म्हाप्रळ पायी अनवानी प्रार्थना दिंडीचे आयोजन केले आहे. तरी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संतोष प्रतिष्ठान तर्फे श्री. संतोष अबगुल यांनी केले आहे.
पायी प्रार्थना दिंडी गीत
आम्ही चाललो चाललो….
संतोष अबगूल प्रतिष्ठानचे आवाहन
करुनी प्रार्थना दिंडीचे आयोजन
आंबेत खाडी पूल निर्मितीची घेऊन कमान
आम्हीं चाललो मंडणगड ते म्हाप्रळ
आम्ही चाललो चाललो प्रार्थना दिंडी घेऊन आम्ही चाललो चाललो….
विठू माऊलीची मूर्ती हाती घेऊन
उपाशी पोटी अनवाणी चालत जाऊनि
टाळ मृदुगं गळ्यात घालुनी
मुखी विठू माऊलीचे जयघोष करुनी
आम्ही चाललो चाललो प्रार्थना दिंडी ….1
मंडणगड एसटी डेपोतून सुरुवात करुनी
शांततेच्या व शिस्तीच्या मार्गाने चालतं राहुनी
सामान्य माणसाला आम्ही बरोबर घेऊनी
आंबेत पुलाच्या समस्येच्या निराकरणासाठी
आम्ही चाललो चाललो प्रार्थना दिंडी ..2
प्रतिस्थानाच्या पत्रव्यवहाराने आता जागे झाले सरकार
फेरी बोटी आता नियमित चालवूनी
पुलाच्या डागडुजीला आता येतोय वेग
पण आम्हाला हवा तो नवा आंबेत पूल म्हणून
आम्ही चाललो चाललो प्रार्थना दिंडी…3
आंबेत पूल नवीन बांधण्याचे निवेदन घेऊनी
सरकारने लक्ष या समस्येकडे वेधण्यासाठी
येणाऱ्या अर्थसंकल्पात निधी पूर्ततेसाठी
लवकरच हा पूल नव्याने उभारण्याच्या दृष्टीने
आम्ही चाललो चाललो प्रार्थना दिंडी…4
आंबेत पूल हा झाला आता जीर्ण
45 वर्षे झाली हो त्याला पूर्ण
डागडुजी करुनी किती हा चालवणार
त्यापेक्षा द्याना हा पूल नव्याने बांधुनी म्हणूनच
आम्ही चाललो चाललो प्रार्थना दिंडी….5
रत्नागिरी रायगड जिल्हाना हा पटकन जोडणारा
चाकरमान्यांना व रुग्णांना मुबंईला लवकर सोडणारा
सर्वच दृष्टीने हा पूल साऱ्यांना फारच महत्वाचा
म्हणून आम्हाला द्याना नवा पूल म्हणूनच
आम्ही चाललो चाललो हो चाललो प्रार्थना दिंडी…6
-प्रदीप शिगवण
