स्वातंत्र्य वीरांना आदरांजली
नवी मुंबई, दि. 23 :- शहिद दिनानिमित्त आज कोकण भवनात भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या प्रतिमेला पूष्पहार अपर्ण करुन आदरांजली देण्यात आली.
शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून मानला जातो. शहीद दिनानिमित्त कोकण भवनाच्या आवारात शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कोकण भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
