नवी मुंबई, दि. १ मार्च, २०२३ प्रतिनिधी (प्रदीप मुरूडकर) : घणसोली रेल्वे स्थानकात फलाटावर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी फलटाखालीच व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावर लोखंडी झाकण ठेवून ते झाकण्यात आले आहेत. ही झाकणे काही प्रमाणात उघडी किंवा व्यवस्थित बसवलेली नाहीत. रेल्वेत चढताना प्रवाशांनी लक्ष न दिल्यास त्यात पाय अडकून प्रवाशाचा जीवही जाऊ शकतो.
रेल्वेत सावधगिरी बाळगावी म्हणून प्रवाशांना वारंवार सुचना देण्यात येतात. परंतु घणसोली रेल्वे स्थानकात ही सावधगिरी रेल्वे प्रशासन पाळताना दिसत नाही. एखादा प्रवाशाचा हकनाक बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न घणसोली येथील रेल्वे प्रवासी करत आहेत.
रेल्वेत चढताना प्रवाशांना याची काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर हे एक जीवघेणे कारण ठरू शकते.
