नवी मुंबई, दि. 31 जुलै : कोणत्याहीआस्थापनेचा अधिकारी, कर्मचारी हा कणा असून नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी अगदी स्थापनेपासूनच चांगले काम केल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिली. असे अनुभवसंपन्न कर्मचारी सेवानिवृत्त होणे ही एक प्रकारे संस्थेची हानी असून सेव निवृत्त होणा-यांनाही महानगरपालिकेच्या कामाची, येथील सहका-यांची आठवण येत राहील अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी आपण सेवानिवृत्त होत असला तरी महानगर -पालिकेचा एक घटक म्हणून, शहराचा एक नागरिक म्हणून आपले सक्रिय योगदान देत राहावे असे आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होणा-या 7 व स्वेच्छानिवृत्ती स्विकारलेल्या 1 अशा एकूण 8 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या सेवानिवृत्ती सन्मान समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्यासह अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, विधी अधिकारी श्री. अभय जाधव तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, विधी अधिकारी श्री. अभय जाधव व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या निवृत्त होणा-या सहका-यांसमवेत काम करतानाचे अनुभव सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून जुलै महिन्यात निवृत्त होणारे लेखा अधिकारी श्री. मारुती शिंदे, उपअभियंता श्री. अविनाश जाधव, सहा.लेखा अधिकारी श्री. रविकांत खरात, प्राथमिक शिक्षिका श्रीम.अलका पवार, उच्चश्रेणी लघुलेखक श्री. राजेंद्र देशमुख, माहिती नोंदणीकार श्रीम. माधुरी नागरे, व्रणोपचारक श्री. संजय चव्हाण तसेच स्वेच्छानिवृत्ती स्विकारणा-या सिस्टर इनचार्ज श्रीम. सरोज साळसकर अशा 8 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
