नवी मुंबई, दि. 1 ऑगस्ट 2025 : थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, सहा. आयुक्त श्रीम. स्वरूपा परळीकर व श्रीम. शिल्पा देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
