बतान, फिलिपिन्स (दि. १२ सप्टेंबर २०२५) :
बटन पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटी (Bataan Peninsula State University – BPSU), फिलिपिन्स व शारदा युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार (Memorandum of Understanding – MoU) आज BPSU च्या Office of the President येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे दोन्ही विद्यापीठांदरम्यान शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन सहकार्य, अध्यापनातील नवनवीन उपक्रम, कौशल्यविकास, तसेच विद्यार्थी-शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी BPSUच्या प्रमुख मान्यवर मंडळींमध्ये
डॉ. रुबी बी. सॅंटोस-मातिबाग (University President)
डॉ. लारा वेलास्को-डेला क्रूझ (VPAA)
प्रा. अँड्रियन डी. पेरिडो (VPSAS)
प्रा. मेयान रोझ मालेबानन (Assoc. Director, CAHS)
डॉ. जोअन्ने डी. लोब्रिनो (Director, INRO)
डॉ. रोवेना बी. वॅलेरियो (Dean, CTECH)
डॉ. आलोनजो डी. मोंटेजो (OC, Instruction)
इंजी. रिगोर जी. रेगालाडो (Dean, CEA)
यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच वेळी आपल्या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष
डॉ. प्रा. प्रदीप ढवळ,
आंतरराष्ट्रीयकरण संचालक, डॉ. प्रतीक मुणगेकर
रजिस्टर आणि कार्यालय अधीक्षक, श्री.आकाश ढवळ
हे मान्यवर विशेष उपस्थित राहिले.
करारानंतर झालेल्या संवादात BPSUचे प्राध्यापकांनी सांगितले की, “या सहकार्यामुळे फिलिपिन्स व भारत या दोन देशांतील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या शैक्षणिक व संशोधन पद्धती जाणून घेण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच कौशल्याधारित शिक्षण व जागतिक दर्जाच्या संशोधनासाठी नवे मार्ग खुले होतील.”
या MoU द्वारे भविष्यात संयुक्त कार्यशाळा, सेमिनार्स, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण (Student Exchange Program), तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प अशा उपक्रमांची अंमलबजावणी होणार आहे.
समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. रुबी बी. सॅंटोस-मातिबाग यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शारदा युनिव्हर्सिटी बरोबरचा हा करार आमच्या विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. दोन्ही संस्थांमधील सहकार्य विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी भविष्य घडविणारे ठरेल.”
शेवटी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून MoU औपचारिकरीत्या पूर्ण झाला.
