ठाणे, दि. 5 फेब्रुवारी 2026 : ‘I.ndiam Army’ च्या बॉम्बे सॅपर्स ‘सदा विजय’ ईएसएम आऊटरीच बाईक रॅलीची १ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे लोहेगाव येथून फ्लॅग ऑफ करण्यात आली होती. ही रॅली सातारा, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांतून प्रवास करत मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ठाणे येथे पोहोचली.
ठाणे येथे नवी मुंबई, मुंबई, कल्याण व ठाणे जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने उपस्थित माजी सैनिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त व भव्य स्वागत केले. ‘सदा विजय ईएसएम आऊटरीच बाईक रॅली २०२६’मध्ये १० जेसीओ व १० एनसीओ सहभागी असून, पुण्याहून सुरू झालेली ही रॅली एकूण ३६ जिल्ह्यांतून प्रवास करत आहे.
या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
1.माजी सैनिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे.
2.माजी सैनिकांना नेटवर्कशी जोडणे.
3.माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करणे.
4.माजी सैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा व योजनांची माहिती देणे.
या मोहिमेअंतर्गत एक पथक पुण्याहून लातूर येथे पोहोचले, तर दुसरे पथक ठाणे येथे दाखल झाले. ठाणे व नवी मुंबई (पेण व ऐरोली) येथे रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. उपस्थित माजी सैनिकांनी या उपक्रमाबद्दल संबंधित अधिकारी व जवानांचे मनःपूर्वक आभार मानले.
बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यातील कोपिनेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन ‘हर हर महादेव’च्या जयघोषात ही रॅली पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. त्यानंतर कल्याण तालुक्यातील नडगाव येथील सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना ‘टीम सदा विजय’ कडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर रॅलीने पुढील प्रवासास प्रारंभ केला.
सदा विजय !
— माजी सैनिक
8
