ठाणे दि. 30 :- ठाणे येथील श्री. चंद्रकांत वासुदेव अचरेकर, (वय 77 वर्षे, रा. सी.एन.एस.लिमिटेड. ब्लॉक नं.5, ग्राउंड फ्लोअर, कन्हैया नगर, कोपरी पोलीस स्टेशन, ठाणे) हा इसम बेपत्ता झाल्याची नोंद कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
बेपत्ता इसमाचे वर्णन असे :- चेहरा गोल व उभट, अंगाने सडपातळ, नाक मोठे, केस काळे(अर्धवट), उंची 5 फुट, रंग सावळा, डोक्यावर परिणाम व उपचार चालू आहे.
असा इसम जर कोणाला आढळल्यास कोपरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस स्टेशन, ठाणे (पूर्व) यांनी केले आहे.
