जिल्ह्यात आज सायंकाळी साडे सातपर्यंत सुमारे ३७ हजार नागरिकांचे लसीकरण
ठाणे, दि. ३१ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार संध्याकाळी साडे सातपर्यंत ३७ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ९ लाख ५९ हजार ४८३ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६२ लाख ७३ हजार ६३८ नागरिकांना तर ४६ लाख ८५ हजार ८४५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४१२ सत्र आयोजित करण्यात आले.
Related Stories
January 21, 2022
