कल्याण, दि. 30 ऑगस्ट, भाग्यश्री रासने(प्रतिनिधी)- सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दिला जाणार उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार यंदा शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांना जाहीर झाला आहे. मंडळाचे संचालक स्व.गंगाधर महादेव तथा पंत जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गणेशोत्सवात उत्तम काम करणाऱ्यास हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा त्याचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. विजय तरुण मंडळाचे प्रमुख विश्वस्त म्हणून विजय साळवी गेली अनेक वर्ष आलेल्या प्रत्येकाला निरपेक्ष भावनेने मदत करण्याचे काम करत आहे. मग ती पूरग्रस्त कुटुंबिय, गरजू विद्यार्थी अथवा शस्त्रक्रियेसाठी रुग्णांंना आर्थिक मदत असो. गणेशोत्सवात देशाभिमान देखावे सजावटीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कामही ते सातत्याने करत आहे त्यांच्यातील याच धडाडीच्या गुणांचा कार्यकर्ता म्हणून यथोचित गौरव यंदा रौप्य महोत्सवी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने करण्यात येणार आहे.
